डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय हे मुंबईतील पहिलं संग्रहालय असून संग्रहालयाची स्थापना १८५७ साली करण्यात आली. हे संग्रहालय व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय ह्या नावाने पूर्वी ओळखले जात असे. १९व्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात घडवण्यात आलेल्या, ललित आणि सजावटीच्या भारतीय कलावस्तुंच्या दुर्मिळ संग्रहाद्वारे, शहरातील समकालीन कला आणि कारागिरीचं प्रदर्शन करण्याच्या हेतूने हे संग्रहालय बांधले गेले. संग्रहालयाच्या कायमस्वरूपी संग्रहामध्ये अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंतच्या शहराच्या ऐतिहासिक घडणीचे दस्तऐवजीकरण करणारी छोटेखानी मृदाशिल्पं, त्रिमित देखावे, नकाशे, लिथोग्राफ्स, छायाचित्रं, मुंबईतील लोकांचं जीवन आणि दुर्मिळ पुस्तकं यांचा समावेश होतो.

प्रवेश तिकिट विक्री संक्षिप्त अहवाल
प्रौढ | मुले | वरिष्ठ नागरिक | दिव्यांग | एकूण पर्यटक | एकूण तिकीट विक्री |
---|